बेपत्ता असलेल्या लांजा तालुक्यातील रिंगणे येथील प्रौढाचा मृतदेह जंगलात आढळून आला
तीन दिवसांपासून पासून बेपत्ता असलेल्या लांजा तालुक्यातील रिंगणे येथील प्रौढाचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. अति मद्यप्राशनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिंगणे येथील हरिश्चंद्र गोपाळ धुळप (वय ५५) यांना दारूचे व्यसन होते. सोमवार दिनांक आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजता ते घरात कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते.
www.konkantoday.com