
थकीत वीज बिलाच्या हप्त्यात सवलत देण्याचे अधिकार फक्त संबंधित अधिकार्यानाच
महावितरण या जनतेच्या मालकीच्या कंपनीचे वीज बिल थकीत ठेवणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीज पुरवठा खंडित करण्याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत निवेदन सादर केले आहे व त्या अनुषंगाने अनेक सवलती देऊन देखील जे ग्राहक वीज बिल भरणा करत नाहीत त्यांची वीज नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई सुरू झाली आहे.
तथापि काही वीज ग्राहक थकाबकिसाठी वीज तोडण्यासाठी येणाऱ्या कामगारांकडून हप्ते द्यावे, आत्ता हे पैसे घ्या बाकी नंतर बघू असे म्हणत हुज्जत घालत असतात. परंतु हप्त्याची सवलत देण्याचे अधिकार उपकार्यकारी अभियंता, उपविभाग प्रमुख यांना असतात. या सवलतीसाठी थकबाकीदार वीज ग्राहकांनी मंजुरी घेतली तरच त्यानुसार हप्ते मिळू शकतील.असा खुलासा महावितरणने केला आहे
www.konkantoday.com