चिपळूण परिसरात रसायन तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करण्याचा मानस – ना .उदय सामंत
लोटे – परशुराम, खेर्डी, खडपोली येथील उद्योग क्षेत्राचा विस्तार लक्षात घेऊन त्याला पूरक अभ्यासक्रमांच्या संस्थांची उभारणी करावी, अशी मागणी कायम केली जात होती चिपळूण परिसरात रसायन तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे. पाच एकर जागा मिळाली तर हे महाविद्यालय चिपळूण परिसरात सुरू केले जाईल. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण येथे दिली
www.konkantoday.com