आठ दिवसांच्या आत MPSC ची पूर्व परीक्षा घेतली जाईल-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी
गुरुवारी दिवसभर ज्या मुद्द्यावरून MPSC चे परीक्षार्थी आंदोलन करत होते, त्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असून येत्या आठ दिवसांच्या आत MPSC ची पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्या तारखेची घोषणा आज १२ मार्च म्हणजे शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.
www.konkantoday.com