अखेर प्रशासनाला मुहूर्त सापडला, साळवी स्टॉप ते कुवारबाव दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामे हटविण्यास सुरवात
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते कुवारबाव या परिसरात रस्त्याच्या बाजूने गेल्या काही महिन्यांत अनधिकृत बांधकामांचे पेव उठले होते रातोरात अनधिकृत बांधकामे उभी राहत होती काही ठिकाणी तर पक्के बांधकाम तर काही ठिकाणी गाडी धुण्यासाठी रॅम्पही टाकण्यात आला होता गेल्या काही महिन्यात अशी अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती विशेष म्हणजे या अनधिकृत बांधकाम असूनही त्यांना ग्रामपंचायतीच्या पावत्या दिल्या जात होत्या या प्रश्नी पत्रकारांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणल्यावर त्यांनी ही बांधकामे हटविण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु तरी देखील ही बांधकामे हटवली जात नव्हती नुकत्याच झालेल्याअधिकाऱ्यांच्या बैठकीत ना. उदय सामंत यांनी कोल्हापूरहून आलेल्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली ही बांधकामे जर पाडली नाहीत तर तुमच्यावर तुम्ही जबाबदार आहात असं समजून थेट कारवाईचा इशारा दिला होता त्यामुळे आज संबंधित खात्याकडून कारवाईला सुरुवात झाली यासाठी पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता सुरुवातीला सिंचन भवन पासुन ही अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली आहे आता या कारवाईत ही सर्व अनधिकृत बांधकामे तोडली जाणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे
www.konkantoday.com