
रिफायनरी नाणारला होणार नाही हा आमचा निर्णय झाला आहे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विधानसभा अधिवेशनाचा काल बुधवार १० मार्च शेवटचा दिवस होता. अधिवेशन संपल्यावर विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व मुद्द्यावर भाष्य केले यावेळी त्यांनी सर्वात जास्त चर्चेत असलेल्या नाणार प्रकल्पावर मोठे वक्तव्य केले आहे. नाणार प्रकल्प हे कोकणात होणार नाही, जर कोकणातील नागरिकांना हा प्रकल्प हवा असेल तसेच तेथील जनता या प्रकल्पासाठी जनतेचा पाठींबा असल्यास या रिफायनरीला मान्यता देऊ परंतु ही रीफायनी नाणार येथे होणार नाही असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हितासाठी चांगला आहे. परंतु एखाद्या उद्योगाला आणि रिफायनरीला आम्हाला वाटले म्हणून विरोध करत नसतो.राज्याच्या हिताचा जरुर असेल आणि आहे पण तो प्रकल्प होणार आहे तेथील जनतेचा या प्रकल्पाला विरोध होता. नाणारमधील काही लोकं आमच्या भेटीसाठी आले होते. ज्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत ते देखील आले होते. त्यांनी असे म्हटलेही आम्ही जमिनी खरेदी केल्या यामध्ये आमची काय चूक त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. तुमच्यासाठी आम्ही निर्णय बदलणार नाही. त्यामुळे जनतेला पाठींबा देत आमची भूमिका स्पष्ट शब्दांत सांगितली होती. तसेच ज्यांना या प्रकल्पाचे स्वागत करायचे आहे ते करु शकतात.
रिफायनरी प्रकल्पासाठी आजसुद्धा जी जागा ठरवु आणि ठरवलेल्या जागेला स्थानिक लोकांचा पाठींबा असेल तर आमचा काही त्याला विरोध नाही परंतु ती रिफायनरी नाणारला होणार नाही हा आमचा निर्णय झाला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पर्यायी जागाही आहे. परंतु कोणताही प्रकल्प राज्याच्या हिताचा असेल तर त्याला सोडता कामा नये हे आम्हाला माहिती आहे. परंतु हा प्रकल्प जिथे जागा ठरवू तेथे या प्रकल्पाला स्थानकांचा विरोध नसेल तर तिकडे तो बनवण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com