प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे तालुका चिपळूण येथे मिनल काणेकर यांच्या हस्ते कोविड लसीकरणाचा शुभारंभ

तालुक्यातील प्रथामिक आरोग्य केंद्र कापरे तालुका चिपळूण येथे कोविड लसीकरण मोहीमे चा शुभारंभ रुग्णकल्याण समितीच्या अध्यक्ष तथा जि. प. सदस्या सन्मा. मिनल काणेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले सकाळ सत्रात 20 व दुपार सत्रात 20 लोकांना लसीकरणाचे नियोजन आरोग्य केंद्राकडून करण्यात आले होते. संपूर्ण सत्राचे नियोजन आरोग्य केंद्र कापरे चे कर्मचारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ ज्योती यादव व वैद्यकीय अधिकारी डॉ अंकुश यादव यांच्या मार्गदर्शनखाली केले होते. या वेळी ग्रामपंचायत बिवलीचे सरपंच शिंदे, ग्रा. प. पोसरेचे सरपंच आडवडे, करबवनेच्या सरपंच श्रीम. खळे, भोम् च्या सरपंच गौरी चव्हाण कापरेचे सरपंच श्री. विजय बांदरे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश यादव आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकरं आरोग्य सहाय्यक श्रीमं. सीमा कुडपकर आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक श्री. परशुराम निवेंडकर यांनी केले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button