सेकंडहँड चारचाकी मिळवून देतो असे सांगून सहा लाखांची फसवणूक,खेड येथील प्रकार
ओळखीचा गैरफायदा घेत जुनी सेकंड हॅड चारचाकी घेऊन देतो. असे आमिष दाखवून चेकद्वारे आणि रोखीने ५ लाख ९५ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी खेड मधील
हुसेन महमद हनिफ परकार (३६ रा. डाक बंगला खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुनील जनार्दन देशाने (५० .रा आंजणी ता खेड) यांनी खेड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार हुसेन महमद हनिफ परकार याने जुलै २०२० मध्ये डाक बंगला येथे यांनी ओळखीचा फायदा घेत विश्वास करून संपादन करून चांगली सेकंड हॅड चारचाकी घेऊन देतो असे आमिष दाखवले. पोटी ५ लाख ५० हजार रुपये चेकद्वारे आणि रोखीने स्विकारून सेकंड हॅड चारचाकी दिली नाही. उलट घेतलेली रक्कमही परत देण्यास टाळाटाळ केली व फसवणूक केली
www.konkantoday.com