रत्नागिरी शहरातील -झाडगाव येथीलरस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याचा नागरिकांचा आरोप
रत्नागिरी शहरातील -झाडगाव येथील
रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याचा नागरिकांचा आरोप असून याबाबत आता शहर राष्ट्रवादीने लक्ष घातले आहे
रत्नागिरी शहरातील -झाडगाव येथील गुरांचा दवाखान्याकडे जाणारा रस्ता नगरपालिकेच्या माध्यमातून कंत्राट पद्धतीने करण्यात येत आहे .
रस्ताचे प्रत्यक्षात डागडुजी करण्याचे काम होते . परंतु कंत्राटदाराकडून योग्य प्रमाणात डांबर घातले जात नसल्याचे तेथील नागरिकांची तक्रार आहे कंत्राटदाराने त्यावर कोणत्याही नुसती खडी टाकून त्यावर ओली माती पसरली असे नागरिकांचे म्हणणे असून याबाबत संबंधित यंत्रणा लक्ष देत नसल्याने राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी याना भेटणार आहे
www.konkantoday.com