प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे येथे आज पासून कोविड लसीकरणाला सुरवात
प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे तालुका चिपळूण येथे कोविड-१९. लसीकरण सत्र सुरू करण्यात येणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ ज्योती यादव मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली वैद्यकीय अधिकारी डॉ अंकुश यादव व आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य कर्मचारी यांनी मेहनत घेऊन हे लसीकरण सत्र लवकर सुरू होण्या साठी प्रयत्न केले आहेत. कापरे आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोकांना वेळीच लस मिळावी व कोविड पासून मुक्ती मिळावी अशी अपेक्षा प्रत्येक कर्मचाऱ्यांची आहे त्या साठीच लवकरात लवकर कापरे केंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आज दिनांक १०/०३/२०२१ रोजी सकाळी १० वाजता सदर लसीकरण मोहीमेचा शुभारंभ रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष तथा जि. प. सदस्या सन्मा. मिनल काणेकर यांच्या हस्ते व पंचायत समिती चिपळूण चे उपसभापती सन्मा. पांडुरंग माळी साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉ ज्योती यादव मॅडम यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रातील ६० वर्षां वरील आणि ४५ ते ५९ मधील को मोर्बिड ज्यांना बीपी शुगर व इतर आजाराचा त्रास आहे अश्या व्यक्तींना लसीकरण करणेत येणार आहे. लसीकरनाला येताना सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, किंवा इतर ओळखपत्र घेऊन यावे बीपी शुगर चा त्रास असले बाबत डॉक्टरांचे पत्र किंवा पुरावा ही सोबत घेऊन यावे असे आवाहन आरोग्य केंद्र कापरे येथून करण्यात आले आहे
www.konkantoday.com