देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील श्री स्वयंभू देवाचा वार्षिक उत्सव फक्त मंदिराचे पुजारी, विश्वस्त आणि देवस्थान समिती सदस्य यांच्या उपस्थितीतच
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील श्री स्वयंभू देवाचा वार्षिक उत्सव फक्त मंदिराचे पुजारी, विश्वस्त आणि देवस्थान समिती सदस्य यांच्या उपस्थितीतच करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना फैलावू नये यासाठी हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
११मार्चपासून होणाऱ्या देवगड येथील श्री स्वयंभू देवाचा वार्षित जत्रोत्सव आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. गर्दी होईल अशा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे किंवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये, यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी, ट्रस्ट, देवस्थान समितीचे सदस्य यांनीच करायचे असून यासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींची मर्यादा असेल, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
www.konkantoday.com