
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा रत्नागिरी भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने सत्कार
कोकणातील पहिला गोड्या पाण्यातील बायोफ्लाॅक कोलंबी संवर्धन प्रकल्प यशस्वी पणे राबवणा-या सौ.दर्शना गौरव भोई, राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेली खो-खो पटू कु.श्रद्धा वासुदेव लाड,पाॅवर लिफ्टिंग मधे नाव मिळवलेली कु.प्राची मनोज सुपल आणि भारतीय मजदूर संघाच्या सौ. संजना अजित वाडकर यांचा त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा प्राजक्ता रूमडे, महिला तालुकाध्यक्ष तनया शिवलकर,महिला शहराध्यक्ष राजश्री शिवलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य स्नेहा चव्हाण, नगर सेविका मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ,प्रणाली रायकर,ओबीसी जिल्हा कार्यकारिणी सदस्य संपदा नांदगावकर, संजना माचकर आणि संपदा तळेकर इ.उपस्थित होत्या.
www.konkantoday.com