
आता चिपळूण एसटी बस स्थानकावर प्रवासी आक्रमक, अनेक तास उलटूनही रत्नागिरी साठी बस नाही
खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथे कोसळलेली दरड दूर केल्यानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असतानाच चिपळूण बस स्थानकात प्रवासी आक्रमक झाले आहे रत्नागिरीला जाण्यासाठी जवळजवळ 70 प्रवासी चिपळूण एसटी स्टँड वर उभे होते मात्र संध्याकाळी सहा वाजल्यापासून आत्तापर्यंत बस सुटलेली नाही त्यामुळे संतप्त झालेले प्रवासी विभाग नियंत्रकांना याबाबत विचारायला गेले असता त्यांच्याकडून दुरुस्तरे केली गेली त्यामुळे प्रवासी आणखीनच आक्रमक झाले