राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणला नेमके काय मिळाले
राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी कोकणासाठी काही प्रमुख घोषणा झाल्या. कोकणाला नेमकं काय मिळालं?
१. श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी रुपये
२. रायगड येथील रेवस ते सिंधुदुर्ग येथील रेड्डी महामार्गासाठी ९५७० कोटींची तरतूद
३. मत्स्य व्यवसायाकरता सरकारने केलेली तरतूद ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. त्यामुळे कोकणच्या मत्स्य आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल येत्या काही दिवसात दिसतील.
४. रायगड येथे केंद्रीय आपत्कालीन एनडीआरएफची (NDRF) तुकडी
५. रायगड, सिंधुदुर्गमध्ये वैद्यकीय महाविद्यालय
६. राजापूर येथील धुतपापेश्वर मंदिराचा विकास. याठिकाणी मंदिराचे जतन आणि संवर्धन केले जाणार
७. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा इथे पथदर्शी तत्वावर कातकरी समाजासाठी एकात्मिक वसाहत
८. रायगड जिल्ह्यातील काशीद येते पर्यटनासाठी जेट्टी विकसित करणार, तर रत्नागिरी येथील भगवती इथे क्रूझ टर्मिनलची उभारणी करणार
९ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना. दोन्ही जिल्ह्यातील साधनसंपतीचा वापर करत उद्योगाचा विकास आणि त्यासाठी १००कोटी देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com