
अर्थसंकल्प ही काही भाजपची मक्तेदारी नाही -अर्थमंत्री अजित पवार
अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्याचे पत्रकारांनी सांगताच ते चांगलेच भडकले. मी काय आज अर्थसंकल्प मांडत नाहीये. २००९ ते १४ पर्यंत मी ४ अर्थसंकल्प मांडले. जयंत पाटील, सुनील तटकरे यांनीही मांडले आहेत. अर्थसंकल्प मांडणे हे आमच्यासाठी नवीन नाही. अर्थसंकल्प ही काही भाजपची मक्तेदारी नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
www.konkantoday.com