नाणारबाबतची तुमची भूमिका योग्य आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फोन करून सांगितले -मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. त्यानंतर आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानं अभिनंदन करण्यासाठी नाणार समर्थक आज मुंबईत कृष्णकुंजवर पोहोचले.
यावेळी नाणार समर्थकांनी राज ठाकरेंनी पत्र लिहिल्यानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं आहे.आम्ही पण विरोध दर्शवला होता आणि यामध्ये पर्यटन चांगलं असलं पाहिजे. प्रकल्पामुळे नुकसान होईल असं आम्हाला वाटत होतं. पण कोरोनामुळे असे प्रकल्प महाराष्ट्रात झाले पाहिजे आणि यामुळे महाराष्ट्राला फायदा होईल, असं राज ठाकरे म्हणालेत. राज्य सरकारने पर्यटनावर लक्ष दिले पाहिजे. पण कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या. त्यामुळे असे प्रकल्प आले पाहिजे, असंही ते बोलायला विसरले नाहीत.
मी पत्र शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. त्यांनी या भूमिके बाबत कौतुक केलं. पत्र पाठवल्यानंतर शरद पवार यांनी मला फोन केला. नाणारबाबतची तुमची भूमिका योग्य आहे असं म्हटलं. यावर आता पवार साहेब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितले.
तसंच मुख्यमंत्री तुम्हाला मला वेळ, देत नसतील तरी ते पवारांना नक्की वेळ देतील कारण सरकार त्यांच्यावर अवलंबून आहे, असा टोलाही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
www.konkantoday.com