
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अपेक्स हॉस्पिटल महिला कर्मचारी आणि डॉक्टरांचा सन्मान
दि. ८ मार्च रोजी मा. निलेशजी राणे यांच्या प्रेरणेने जेष्ठ समर्थक व कार्यकर्ते श्री. नित्यानंद दळवी आणि कुटुंबीय यांनी अपेक्स हॉस्पिटल येथे येऊन डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये. , डॉ. रवींद्र गोडे , सौ. तेजा मुळ्ये यांचा कोव्हीड योद्धाम्हणून सत्कार केला. याबरोबरच सर्व महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रसूती तज्ज्ञ डॉ किरण जोशी या अध्यक्ष म्हणून लाभल्या. श्री नित्यानंद दळवी यांनी रत्नागिरीच्या नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय सुरू झाल्याचे समाधान यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला दळवी व साळवी परिवार उपस्थित होता. डॉ सुशीलकुमार मुळ्ये व डॉ मिरा मुळ्ये यांनी सर्वांचे आभार मानले. सौ तेजा मुळ्ये यांनी सुत्रसंचलन केले.
www.konkantoday.com