गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात सवलत
महिला दिनानिमित्त अजित पवार यांनी मोठं गिफ्ट दिलं असून महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांत शुल्कात सवलत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतच अजित पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली होती.कोणतंही कुटुंब यापुढं राज्यात घर विकत घेईल तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावे व्हावी आणि ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून १ एप्रिल २०२१ पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात सवलत दिली जाईल”. ही सवलत एक टक्के असणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली
www.konkantoday.com