कोरोनामध्ये एसटीला तब्बल ३ हजार ८०० कोटीच्या महसूलावर पाणी सोडावे लागले
कोरोनामुळे एसटी महामंडळाला प्रचंड आर्थिक झळ सहन करावी लागली असल्याचेही समाेर आले आहे. कोरोनामध्ये एसटीला तब्बल ३ हजार ८०० कोटीच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे. या आर्थिक संकटामुळे एसटीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एसटी ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सुमारे ९० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्येच्या दळणवळणाचा मुख्य आधार आहे. कोविडमुळे दुरावलेली प्रवासी संख्या, वाढत्या डिझेलच्या किंमती, टायर, ऑईल पुरविणाऱ्या कंपन्यांनी खंडित केलेला पुरवठा, सुट्या भागांची कमतरता, भंगारात निघणाऱ्या बसेसची वाढती संख्या, कर्मचाऱ्यांची थकीत देयके (भविष्य निर्वाह निधी, उपदान रक्कम, वैद्यकीय देयके) अशा अनेक समस्यांनी एसटी महामंडळाला ग्रासले आहे.
www.konkantoday.com