कुठल्याही घटकासाठी काहीही न घेऊन आलेला अर्थसंकल्प -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
कुठल्याही घटकासाठी काहीही न घेऊन आलेला, केवळ लीपा पोती करणारा अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. शेतकरी, सामान्य, तरुण, मागासवर्गीयांची निराशा झाली. अतिशय निराशाजनक हा अर्थसंकल्प आहे,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने आज मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हे राज्य सरकारचं बजेट होतं की मुंबई महापालिकेचं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या अर्थसंकल्पातून पूर्ण निराशा झाली. बजेटमधून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, ठाकरे सरकारची कर्जमाफी ही सर्वात फसवी कर्जमाफी ठरली आहे. वीज बिल माफीबाबतही कोणताही दिलासा दिला नाही. पायाभूत सुविधांबाबत जे प्रकल्प घोषित केले, ते सध्या सुरु आहेत किंवा केंद्र सरकारच्या मदतीने सुरु आहेत. एकीकडे केंद्र सरकारला नावं ठेवायची. पण केंद्र सरकार दिलेल्या भरीव निधीचा उल्लेख करणं टाळलं. हे राज्य सरकारचं बजेट होतं की मुंबई महापालिकेचं? मुंबई मनपा बजेटमधल्याच योजना सरकारने ज्याला राज्य सरकार एकही पैसा देत नाही, त्याही योजना या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आल्या.
www.konkantoday.com