मध्य प्रदेश सरकारनं महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य केला
मध्यप्रदेशात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या वाढती प्रकरणं पाहता मध्य प्रदेश सरकारनं महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगितलं की, शुक्रवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रालयात कोरोनाच्या समीक्षा बैठकीदरम्यान यासंबंधित निर्देश दिले.
समीक्षा बैठकीत शिवराज सिंह म्हणाले की, भोपाळ, इंदूर, जबलपूर, बैतूल, छिंदवाडा, उज्जेन आणि महाराष्ट्राशी जवळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मध्य प्रदेशातील कोरोनाची स्थिती बिघडू नये यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आणणं अनिवार्य असेल.
www.konkantoday.com