चिपळूण वहाळ घडशीवाडी येथे धक्कादायक घटना ,जन्मदात्या मातेने आपल्या एक महिन्याच्या मुलीला बादलीत बुडवून मारले
चिपळूण तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथे अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जन्मदात्या आईनेच एक महिन्याच्या मुलीला पाणी भरलेल्या बादलीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी सौ शिल्पा प्रवीण खापले हिला ताब्यात घेण्यात आले आहे ही घटना चिपळूण तालुक्यातील वहाळ येथे घडली. शुक्रवारी दुपारी २ वाजता उघडकीला आली. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.भारतीय सैन्य दलात सेवेत असलेले प्रवीण बळीराम खापले यांची शौर्य ही कन्या होती. महिना भरापूर्वीच त्यांना कन्यारत्नेचा लाभ झाला.प्रवीण खापले हे सकाळी ९ वाजता सावर्डे येथे कामानिमित्त निघून गेले होते.त्यांची पत्नी शिल्पा व प्रवीण यांची आई घरीच होत्या. शेजारच्या दोन मुली धार्मिक कार्यक्रमाचे निमंत्रण सांगण्यासाठी त्यांच्या घरी आल्या होत्या.नंतर शिल्पा या घरात बेडरूममध्ये गेल्या असता शौर्याही भरलेल्या बादलीत डोके खाली व पाय वर अशा अवस्थेत सापडून आली तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु ती मयत झाली होती हा प्रकार कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली चिमुकली शौर्या हिचा मृत्यू संशयास्पद वाटत होता पोलिसांनी या प्रकरणातील सर्व साक्षीदार त्यांचे जबाब घेतले व बारकाईने पोलीस चौकशी सुरू केली त्यानंतर पोलीस चौकशीत शौर्या हिला तिची आई सौ शिल्पा खापले हिनेच पाण्याच्या भरलेल्या बादलीत बुडवून जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिल्पा हिने नेमके हे कृत्य कशामुळे केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही
www.konkantoday.com