रत्नागिरी जिल्ह्याला घर बांधणी घर दुरुस्ती अधिसूचनेमधून वगळण्यात येऊ नये मागणीसाठी . ना उदयजी सामंत ह्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आमदारांनी नगरविकास मंत्री मा.नाम एकनाथजी शिंदे यांची घेतली भेट

  • शासनाच्या दि. २ डिसेंबर २०२० रोजी निघालेल्या अधिसूचने नुसार रत्नागिरी जिल्ह्याला वगळून घर बांधणी घर दुरुस्ती चे अधिकार देण्यात आले नसल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना होणार त्रास व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीयांच्याकडे वारंवार नागरिकांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातरत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचेआमदार डॉ.राजनजी साळवीव चिपळूणसंगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम, दापोलीमंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम ह्यांनी शिवसेना उपनेते, शिवसेना प्रवक्ते, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. ना उदयजी सामंतह्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.नाम एकनाथजी शिंदेयांच्याकडे निवेदन सादर केले.
    राज्यातील नगरविकास विभागाने दि. २ डिसेंबर २०२०* रोजी च्या अधिसूचने अन्वये इमारतबांधकामाबाबत बांधकाम परवानगी चे निकष निश्चित केले आहेत. सदर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मधील खंड क्र.२ मधील *२.१.२(xv) तरतुदीनुसार १५० चौ. मी. क्षेत्रफळावरच्या भूखंडावरीळ आणि १५० चौ. मी ते ३०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावरील इमारत बांधकामाकरिता परिशिष्ठ मधील विहित अटींच्या अधीन राहून परवानगी घेण्यातून सूट दिली आहे. तसेच सदरच्या अधिसूचनेमधील तरतुदींनुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दि. २४ फेब्रुवारी २०२१ च्या पत्रा अन्वये रत्नागिरी जिल्हा वगळता इतर सर्व *मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांना दिल्या आहेत.
    परंतु रत्नागिरी जिल्ह्याची प्रादेशिक योजना बनवण्याचे काम अद्याप सुरू असल्याने हा नवीन निर्णय रत्नागिरी जिल्ह्या साठी लागू करण्यात आलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्याची प्रादेशिक योजना प्रसिद्ध होणेसाठी अद्याप काही कालावधीलागणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्या तील जनतेला घरबांधणी परवानगी मधील उपरोक्त सुटीपासून वंचित राहावे लागू नये यासाठी उपरोक्त निर्णय तूर्तास रत्नागिरी जिल्ह्या साठी सुद्धा लागू करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेअशी विनंती नगरविकास मंत्री मा.नाम एकनाथजी शिंदे यांच्याकडे यावेळी केली. त्यानुसार मागणी करताच मा. मंत्री महोदयांनी ताबडतोब राज्याच्या *ग्रामविकास मंत्रीह्यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून आपल्या दालनात ग्रामविकास विभागाचा अधिकारीह्यांची बैठक घेऊन याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले
    www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button