
आरोग्य मंदिर येथे घरफोडी; आठ लाखांचा मुद्देमाल लंपास.
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथे भरदिवसा घर फोडून अज्ञाताने रोख रक्कमेसह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना शनिवार 21 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 वा. कालावधीत घडली आहे. याबाबत पार्थ प्रसन्न आंबुलकर (रा.आरोग्य मंदिर,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी पार्थ आंबुलकर हे पत्न्ाी आणि आईसह कपडे खरेदी करण्यासाठी बाजारपेेठेत गेले होते.
खरेदी करुन झाल्यानंतर ते सायंकाळी 4.30 वा. सुमारास घरी परतले. तेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांच्या बेडरुममधील लाकडी कपाटातील रोख 7 लाख 50 हजार,चांदीची 100 ग्रॅम वजनाची दोन नाणी, व 10 गॅ्रम सोन्याचे वळे असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. ही चोरी अज्ञाताने त्यांच्या घराच्या किचन रुमच्या लाकडी दरवाजाच्या आतील बाजुची वरील कडी व कडी अडकविण्याचा खालील बाजुचा लाकडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत केली आहे.