
खेडला शिकणार्या साताराच्या युवकाचा मेढ्याजवळ अपघाती मृत्यू
रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातार्याला जात असलेल्या युवकावर शनिवारी रात्री मेढा येथे काळाने घाला घातला. खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातार्याला जात असताना मेढा बसस्थानकाजवळ अचानक आडव्या आलेल्या एसटीला दुचाकी धडकून अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आदित्य संजय साळुंखे (वय २३, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बसाप्पा पेठ, करंजे, सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.आदित्य खेड येथील योगिता डेंटल कॉलेजला बीडीएसच्या चौथ्या वर्षात शिकायला होता. रक्षाबंधनानिमित्त तो पल्सर मोटारसाय कलवरून पोलादपूर, महाबळेश्वरमार्गे सातार्याला निघाला होता. सातारा अवघ्या २४ किलोमीटर अंतरावर आला असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.www.konkantoday.com