सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील यात्रोत्सव यंदा गाव पातळीवर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील यात्रोत्सव यंदा गाव पातळीवर होणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल (3) जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत महत्वाच्या सुचना देण्यात आल्या. उत्सव काळात बाहेरील नागरिक, पर्यटकांना कुणकेश्वरला जाता येणार नाही. यासाठी कुणकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर बंदोबस्त राहणार आहे. मंदीरातील पुजारी, विश्वस्त, देवस्थानचे कर्मचारी आदींनी खबरदारी म्हणून ऐच्छिक कोविड चाचणी करून घेतल्यास सोयीचे होईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
www.konkantoday.com