ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रात सवलत मात्र रत्नागिरी जिल्हा अपवाद
ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रात सवलत मात्र रत्नागिरी जिल्हा अपवाद ठरला आहे
रत्नागिरी जिल्ह्यात ‘रिजनल प्लॅन’ (विभागीय बृहद् आराखडा) न
झाल्याचा जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. राज्यातीलग्रामीण भागांत म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे 300 चौरसमीटर (3200 चौरस फूट) क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील
बांधकामांना आता नगररचनाकारच्या परवानगीची गरजभासणार नाही. जागेची मालकी कागदपत्रे, मोजणी नकाशा,इमारत आराखडा आणि हे सर्व एकात्मिक विकास नियंत्रण
नियमावलीनुसार असल्यास आणि परवानाधारक अभियंत्यांचे
प्रमाणपत्रानंतर ग्रामपंचायत स्तरावर घर बांधण्याची परवानगीमिळणार आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्याला यातून वगळण्यात आले आहे.हा आराखडा कधी पूर्ण होईल याचा कालावधी ठरलेला नाही त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यावरील हा अन्याय दूर करावा अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com