
खेड येथील ग्रामीण सहकारी संस्थेत ८८लाखाचा अपहार
खेड्यातील तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण संस्थेत ८८लाखाचा अपहार झाला होता. त्याप्रकरणी आता पोलीस स्थानकात त्यावेळच्या बारा कर्मचारी व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२००५ ते २००८ या कालावधीत संशयित कार्यरत असणारे सचिव चेअरमन आणि संचालकाने संगमताने खोटी कर्जप्रकरणे तयार करून बोगस कर्जाचे वाटप केले होते.कर्जावरील व्याज वसूल करताना ते कमी रुपये आकारून कर्ज रक्कम कर्ज खतावणी रजिस्टरला जमा म्हणून नोंदविले होते.याप्रकरणी या संस्थेच्या बारा जणांविरुद्ध लेखापरीक्षक सुनील सासवडकर यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com