कार्यालयीन अधीक्षक गैरहजर,तत्काळ कारवाई करण्याची भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांची मागणीकोविड काळात जिल्हा रुग्णालयाचे
रत्नागिरी- कोविड 19 महामारीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या खूप वाढत होती. या कालावधीत आरोग्य यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत असताना मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक ए. एल. निम्मलवार हे विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर होते. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली असून यासंदर्भात अधिवेशनात आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
कामावर येण्यासाठी विविध कारणे देऊन कामावर येणे टाळत होते. त्यामुळे साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती अधिनियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यास आरोग्य उपसंचालकांनी आदेश दिले होते. परंतु ही कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक ए. एल. निम्मलवार यांच्याविरोधात प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि लिपिकांनी केलेली तक्रार मागे घेतली. परंतु अशा प्रकारे तक्रार मागे घेता येत नाही. परंतु तशी निवेदने सादर करून निम्मलवार यांना क्लिन चिट देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे.
www.konkantoday.com