आंबा, काजू, सुपारीसह सर्वच पिकांच्या उत्पादनावर तापमान वाढीवर परीणाम
अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर आता कोकणातील फळ बागायतदारांना तापमान वाढीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. १ मार्चपासून तापमानात मोठी वाढ झाली असून याचा विपरीत परिणाम आंबा, काजू, सुपारीसह सर्वच फळपिकांच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे अगोदरच विविध समस्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तापमानवाढ ही समस्या डोकेदुखी ठरणार आहे.
www.konkantoday.com