
चिपळूण येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राला व्हीलचेअरचे वाटप
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण या राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बहाद्दूर शेख नाक्यातील विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यानंतर चिपळूण येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद कळवंडे, कापरे गट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हीलचेअर भेट देण्यात आली. उपकेंद्र भिले येथेही व्हीलचेअर भेट देण्यात आली. रिपब्लिकन पक्षाने एक आगळावेगळा असा वर्धापन दिन साजरा केला.
यावेळी आरोग्य निरीक्षक ए. एच. शिरडे, आरोग्य सहाय्यक श्रीमती पी. पी. हुमणे, निर्माण अधिकारी श्रीमती व्ही. व्ही. हरवंदे, आरोग्य सेविका ममता मांडवे, आरोग्य सेवक सचिन कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तप्रसाद मोहन गेजगे, समुदाय आरोग्य अधिकारी नयन होले, आरोग्य सेवक मंगेश जाधव, सुषमा चांदिवडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, उमेश सपकाळ, तालुका सहसचिव भूपेंद्र पवार, तालुका सल्लागार अशोक पवार, उपाध्यक्ष सुधीर गमरे, युवक जिल्हाध्यक्ष प्रशितोष कदम, अध्यक्ष मंगेश जाधव, सरचिटणीस अमोल कदम, नियम संघटनेचे सदस्य राजेश पवार, सचिन सकपाळ, भाऊ पवार, सुनील तांबे, मंगेश पवार, करंबवणे उपसरपंच संजय जाधव पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.




