जनशताब्दी एक्स्प्रेस आता दररोज धावणार
दादर ते मडगाव आणि परत या मार्गावर धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी (क्र. 01151/01152) आता दररोज धावणार आहे.
करोनाच्या काळात ही गाडी बंद होती. गेल्या १० फेब्रुवारीपासून सध्या ती सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे पाच दिवस धावत आहे. ही गाडी आज पासून (दि. २ मार्च) दररोज धावणार आहे. तिच्या वेळापत्रकात आणि स्थानकांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
www.konkantoday.com