
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि संघर्ष समितीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनी दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रत्नागिरी, आणि थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विध्यमाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन सिव्हिल हॉस्पिटल शेजारी येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्ष स्थान एल. व्ही. पवार साहेब यांनी भूषविले. प्रथम तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. बौद्धाचार्य याच्या अधिपत्याखाली त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा पठण करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्य आणि त्याचे विविध पैलू एल. व्ही. पवार, दिपक जाधव, सुनिल आंबूलकर, राजेंद्र कांबळे, अमोल जाधव, बी. के. कांबळे, जाधव गुरुजी, अशोक जाधव, स्मिता कांबळे, आदी मान्यवरांनी उलगडले. थिबा राजा कालीन बुद्धविहाराची जागा समाजाच्या ताब्यात घेऊन तेथे समाजाच्या हक्काचं बुद्ध विहार उभारणे हीच खरी बाबासाहेबांच्या विचारांना आदरांजली ठरेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या सभेस दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, आणि थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीचे शिवराम कदम, दिवेन कांबळे, तुषार जाधव, संजय कांबळे, अजित जाधव, चंद्रकांत जाधव, प्रदिपदादा पवार, आणि बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिजित तांबे यांनी केले.




