करोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील अंगारकी यात्रोत्सव रद्द
करोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील अंगारकी यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.
येत्या मंगळवारी (दि. २ मार्च) अंगारकी यात्रा आहे. गणपतीपुळे येथे प्रत्येक संकष्टीला मोठी गर्दी होते. येत्या मंगळवारी करोनानंतरची पहिलीच अंगारकी असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रोत्सव रद्द करण्याची सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देवस्थानला करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गणपतीपुळे देवस्थानाने यात्रोत्सव रद्द केला आहे. केवळ मोजक्या भाविकांना अंगारकीदिवशी करोनाचे नियम पाळून दर्शन घेता येईल.
www.konkantoday.com