शहरातील गरजूंना मोफत कपडे मिळावेत, यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने कपडा बॅंक स्थापन केली
शहरातील गरजूंना मोफत कपडे मिळावेत, यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने कपडा बॅंक स्थापन केली आहे. नागरिकांना आपले वापरात न येणारे कपडे या कपडा बॅंकमध्ये जमा करता येतील. या कपड्यांचा उपयोग गरजवंतांना नक्कीच होणार असून त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा.
गरजू लोकांना कपडे मिळण्यासाठी आम्ही केलेल्या एका छोट्या प्रयत्नाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे असे पालिकेचे आरोग्य सभापती निमेश नायर यांनी व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com