राज्याचे मुख्यमंत्री डोळे मिटून गप्प बसलेले नाहीत, ते कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत-शिवसेना खासदार संजय राऊत
पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले आहेत. या प्रकरणामध्ये वनमंत्र्यांचं नाव असून देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काहीही कारवाई करत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री डोळे मिटून गप्प बसलेले नाहीत, ते कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणाला पाठिशी घालणार नाहीत”, अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे.
www.konkantoday.com