दापोली मतदारसंघ महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरेल आमदार योगेश कदम यांचे प्रतिपादन

दापोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरेल अशी काम आपण या मतदारसंघात करून दाखवू अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी बोलताना दीली. शहराजवळील गिम्हवणे येथील गजानन महाराज नगर येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन व सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलताना शुक्रवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी व्यासपीठवर आमदार योगेश कदम, पं. स. सभापती रऊफ हजवानी,गिम्हवणे -वणंद ग्रूप ग्रा. पं. सरपंच साक्षी गिम्हवणेकर, उपसरपंच किशोर काटकर, नगराचे अध्यक्ष सुनील गुरव, महिलाध्यक्ष स्फूर्ती करमरकर,रोहिणी दळवी,दीप्ती निखार्गे, रेश्मा झगडे,मोहन शिगवण, शंकर साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित आमदार, गिम्हवणे-वणंद ग्रा. पं.सरपंच, उपसरपंच, उपस्थित ग्रा. पं. सदस्य यांचा गजानन महाराज नगरातर्फे सत्कार अध्यक्ष सुनील गुरव,स्फूर्ती करमरकर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार योगेश कदम पुढे म्हणाले की, विकासकामे करताना कोणीही राजकारण आड आणू नये ग्रामपंचायत कोणाचीही असो माझ्याकडे विकासकामांसाठी या आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी गजानन महाराज नगराचे विशेष कौतुक करताना नगरही माझ्या हक्काचे असून शहराजवळील गिम्हवणे- वणंद गावाच्या विकासासाठी आपण कुठेही कमी नाही. आमचे उपसरपंच किशोर काटकर यांच्या माध्यमातून वणंद गावचा सपूर्ण विकास केला जाईल यासाठी आमदार म्हणून आपले कायम सहकार्य राहील अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली. यावेळी नगराचे अध्यक्ष सुनील गुरव यांचे हस्ते मंजूर कामाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. पंचायत समिती सभापती रऊफ हजवाने यांनी गजानन महाराज नगरासाठी दोन लाख रुपयांचा विकासनिधी देत असल्याची घोषणा केली. सरपंच साक्षी गिम्हवणेकर यांनी नगराचे आभार मानले. हा कार्यक्रम शासनाचे सर्व नियम व सोशल डिस्टन्स पाळून घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन महाराज नगरातील सर्व पदाधिकारी सदस्यांनी व महिला मंडळाने मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागत व आभार नगराचे ज्येष्ठ सदस्य प्रा.कैलास गांधी यांनी मानले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button