
खेर्डी, चिंचघरी व अडरे गावाच्या सिमेवरील बैलगाडी शर्यतप्रकरणी आठजणांवर गुन्हा
शासनाने बंदी घातलेल्या बैलगाडी शर्यतीतून कोरोना पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. खेर्डी, चिंचघरी व अडरे गावाच्या सिमेवर गुरूवारी ही स्पर्धा घेण्यात आली होती.
प्रविण जगदीश कदम (टेरव दत्तवाडी), नितीश शिर्के (अडरे), महंमद खान (वेहेळे), अश्रम कडवेकर (दळवटणे), अनंत जाधव (निव्हाळ), कदम (अडरे), मधुकर सावर्डेकर (कळवंडे), ऋतिक दाते (खेर्डी कातळवाडी), असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सुहास मोहिते (टेरव बौद्धवाडी) यांनी चिपळूण पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार शासनाने कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने काही नियम व कायदे लागू केले आहेत. तरीही दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बैलगाडी शर्यत आयोजित करून संबंधितांनी विनामास्क गर्दी जमविली होती.
www.konkantoday.com