रत्नागिरीतील ओसवाल नगर येथील बंगल्यातील सेक्स रॅकेटची चौकशी सुरू,संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी शहरातील ओसवालनगर जवळील एका बंगल्यावर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दापाश केला. पोलिसांनी एका पीडित युवतीची सुटका केली असून रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेसह पुरूषाला ताब्यात घेतले हाेते
रत्नागिरी शहरात वेश्यव्यवसाय सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना मिळाली होती. संबधित वेश्याव्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले होते. पोलीस संबंधितांचा शोध घेत होते, मात्र ते सतत जागा बदलत असल्याने पोलिसांना अडचणी येत होत्या.धाडीदरम्यान पोलिसांनी सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. पद्मीनबाई तुकाराम बादलवाड (वय – ४३, रा.सोलापूर) आणि शिवाजी पाटील (वय – ५८ रा.वारूंज कराड) अशी दोघांची नावे आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
रत्नागिरीत सेक्स रॅकेट पकडल्याची बातमी पसरताच शहरात खळबळ उडाली .पोलीस रॅकेटचा कसून शोध घेत आहेतआरोपींकडे सापडलेल्या मोबाइलवरून त्यांच्याशी संपर्क साधलेचा शोध घेण्यात येत आहे . सेक्स रॅकेट सुरू असलेला बंगला आरोपींनी दोघांनी भाड्याने घेतला होता. हा बंगला पोलिसांनी सील केला आहे. तसेच एक कार जप्त केली आहे
www.konkantoday.com