
मुंबईतून जलमार्गाने जलद जाण्या साठी लवकरच वॉटर टॅक्सी’ची सुविधा
मुंबईतून जलमार्गाने वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, रेवस आदी परिसरात झटपट पोहोचण्याचे मुंबईकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून ‘भारतीय सागरी परिषदे’च्या (इंडियन मेरिटाइम समिट) निमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि विविध कंपन्यांमध्ये याबाबत नुकतेच सामंजस्य करार करण्यात आले. परिणामी, येत्या काही महिन्यांतच नागरिकांना ‘वॉटर टॅक्सी’ची सफर घडणार आहे.वॉटर टॅक्सीमधून मुंबई (प्रिन्सेस डॉक) ते वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी रेवसदरम्यान प्रवास करता येणार आहे. तसेच मुंबई ते बेलापूर हे अंतर सुमारे तासाभरात कापता येईल. वॉटर टॅक्सीची क्षमता सुरुवातीला १० ते ५० प्रवासी इतकी असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने १०० प्रवाशांपर्यंत क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.
www.konkantoday.com