अन्य शिक्षक, शाळा या आदर्श कशा बनतील यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक-रोहन बने
आदर्श शिक्षक, शाळा यांची जबाबदारी आता वाढली आहे. अन्य शिक्षक, शाळा या आदर्श कशा बनतील यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी केले.
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण कार्यक्रम ऑनलाईन झाला. यावेळी उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण व वित्त समिती सभापती सुनील मोरे, ज्येष्ठ जि.प. सदस्य उदय बने, सौ. रचना महाडीक, सौ. नेत्रा ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी उदय बने यांनी रत्नागिरी जिल्ह्यातूनही आयएएस व आयपीएस अधिकारी कसे बनतील यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत.
www.konkantoday.com