
मौजे खानू येथे काल शनिवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी
रत्नागिरी तालुक्यातील मौजे खानू येथे शनिवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मनोहर अर्जुन सुवारे (वय ७०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.मौजे खानू येथे काल सायंकाळी ६.३० च्या दरम्यान ही घटना घडली.सुवारे यावेळी बाजार करून येथील श्री. महेश सनगर यांचे घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या गोवंडेवाडीकडे जाणाऱ्या पाय वाटेने घरी चालले होते. त्यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात श्री सुवारे हे जखमी झाले. त्यांच्या डाव्या व उजव्या कानाच्या वरच्या दोन्ही बाजूस व डाव्या गालावर जखमा झालेल्या आहेत.
जोरात ओरडा ओरड झाल्यावर जवळच घर असलेले महेश सनगर हे त्या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी बिबट्या यांच्यावर हल्ला करत होता. जोरात आवाज दिल्यावर बिबट्याने आपल्या पिल्लासह तेथून पळ काढला रक्त बंबाळ अवस्थेत त्यांच्यावर पाली येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केले. नंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
www.konkantoday.com