राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रिफायनरीत प्रकल्पाचे वाढते समर्थन लक्षात घेऊन या प्रकल्पाची तात्काळ अंमलबजावणी करावयास हवी– चंद्रकांत देशपांडे
राजापूर तालुक्यात नाणार व परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे राजापूरच्याच नव्हे तर रत्नागिरी जिल्हयासह राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातुन निर्माण होणाऱ्या रोजगारातुन आणि छोटया व्यवसायातुन इथला तरूण आणि छोटे उद्योजक स्थानिक पातळीवर व्यवसाय करून आपला आर्थिक विकास साधू शकणार आहेत. त्यामुळे राजापूरातील तमान जनतेने उत्स्फूर्तपणे या प्रकल्पाचे स्वागत करावयास हवे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे वाढते समर्थन लक्षात घेऊन या प्रकल्पाची तात्काळ अंमलबजावणी करावयास हवी अशी रोख ठोक भुमिका शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ चंद्रकांत देशपांडे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश प्रवक्ते हरिष रोग्ये यांनी मांडली आहे.
www.konkantoday.com