
टाटा सफारीचे बक्षिस लागल्याचे सांगून १६ हजार ७०० रुपयांची तरूणाची ऑनलाईन फसवणूक
खेड तालुक्यातील घडशीवाडी येथे राहणारा अक्षय गोविंद डाककर या २० वर्षाच्या युवकाची टाटा सफारीचे बक्षिस लागल्याचे सांगून १६ हजार ७०० रुपयांची फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी अक्षय याच्या मोबाईलवर दयानंद मिश्रा असे नाव सांगणार्या व्यक्तीने फोन करून तुम्ही विजेते आहात. तुम्ही टाटा सफारी गाडी जिंकली आहात, तुम्हाला गाडी नको असेल तर १२ लाख ६० हजार रुपये देण्यात येतील असे सांगून फिर्यादी अक्षय याचा विश्वास संपादन केला. व त्याला प्रोसेससाठी १६ हजार ७०० रुपये भरण्यास सांगून गुगलपेद्वारे ही रक्कम स्विकारून कोणतेही बक्षिस न देता त्याची फसवणूक केली. याबाबत खेड पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
www.konkantoday.com