चिपळूणात आणखी एक फसवेगिरी उघड , आंध्रप्रदेशच्या टोळीकडून शेतकर्‍यांची फसवणूक

नारळाच्या खोडामध्ये टॉनिकचे इंजेक्शन दिल्यावर त्यावर लवकर व अधिक फळधारणा होते असे सांगत आंध्रप्रदेशच्या एका टोळीने शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे समोर आला. शेतकर्‍यांना या जावई संशोधनातून आमिष दाखवत त्यांच्याकडून प्रत्येकी चार ते सहा हजार रुपये त्यांनी उकळले होते. मात्र या टोळीचा प्रताप खेर्डीतील जागृत ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी एकाला पकडून प्रसाद दिला. लोकप्रतिनिधींनी त्याला धारेवर धरताच शेतकर्‍यांचे घेतलेले पैसे त्याने परत केले. हा सर्व प्रकार चिपळूण पोलीस स्थानकापर्यंत गेला मात्र कोणाचीही तक्रार नसल्याने त्याला समज देवून सोडण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button