
महाविद्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील अनेक शहरांत करोना बळावू लागला आहे. अनेक जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, महाविद्यालयांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मुद्द्यांवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. महाविद्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून घ्यावा. तसे निर्देश देण्यात आले असल्याची महत्वाची माहिती सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com