कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाईला सुरवात ; मास्क न वापरण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई
खेड : तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने कारवाईची कठोर भूमिका घेतली आहे. आज नगरपालिका हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या सुमारे ४० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी तालुका प्रशासनाने भरती पथक तयार केले असून या भरारी पथकात महसूल, पोलीस, आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी सहभागी आहेत. आज शहर व परिसरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये, एसटी स्थानक, स्वीट मार्ट्स या ठिकाणी भेटी देऊन कोरोनासंदर्भातील सर्व निंयमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने याबाबत माहिती देताना म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वरवली गावात आजही कोरोनचे रुग्ण आढळून येत आहेत. काळ केलेल्या कोरोना चांचणीनुसार आणखी पाचजण कोरोना पॉसिटीव्ह आढळून आल्याने या गावातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६४ झाली आहे. तर खेड तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७४ झाली आहे. एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येणे ही बाब गंभीर असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जे गाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे ते गाव प्रतिबंधित घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभयागाचे कर्मचारी इथे रात्रदिवस काम करत आहेत.
वरवली गावातील कोरोनाची साथ तालुक्यात पसरू नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. लग्नकार्य किंवा धार्मिक कार्य या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष भरारी नेमण्यात आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक लोक जर लग्नकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमात आढळून आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मंगलकार्यालयात कोरोना नियमांचा भंग होईल त्या मंगलकार्यालवर व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल केले जातील असे सोनोने यांनी बोलताना सांगितले.
www.konkantoday.com