सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा मला सांगितल्याशिवाय खंडित करायचा नाही -पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा मला सांगितल्याशिवाय खंडित करायचा नाही आणि कोरोना टाळेबंदीमुळे आधीच अडचणीत आलेल्या व्यापारी वर्गाने वीज बिल भरण्याबाबत दिलेल्या प्रस्तावानुसार सर्वांना हप्ते बांधून द्या, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरणला दिले.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सुरू केलेल्या कारवाईला पायबंद बसला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक वीज ग्राहकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.
www.konkantoday.com