महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा आढळलेला नवा प्रकार अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक-डॉ. रणदीप गुलेरिया
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा आढळलेला नवा प्रकार अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याचा इशारा ‘एम्स’ रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला.
महाराष्ट्रात आढळणाऱ्या नव्या प्रकारामुळे प्रतिपिंडे तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही डॉ. गुलेरिया म्हणाले. महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे.
www.konkantoday.com