
आंबा घाटात मान्सूनपूर्व उपाययोजनांवर भर, धोकादायक ठिकाणी सुरक्षित उपाययोजना.
आंबा घाट हा कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळणे, माती खाली येणे यासारख्या प्रकारामुळे चर्चेत येतो. मात्र मागील दोन वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोकादायक ठरणार्या, यापूर्वी खचलेल्या व दरड कोसळलेल्या तीन ठिकाणी सुरक्षित उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घाटातील वाट सध्या सुरक्षित होणार असे वाटत असली तरी काही वळणाच्या भागात अजूनही वाट बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामध्ये आंबा घाटात बारा ठिकाणी माती रस्त्यावर आल्यामुळे घाट बंद ठेवण्यात आला होता. यावेळी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून येणारी वाहतूक अणुस्कुरामार्गे वळवण्यात आली होती. रस्त्यावर आलेली माती काढून टाकल्यानंतर दरीच्या बाजूने खचलेल्या तीन ठिकाणी दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी मंजूर केला गेला होता. ती दुरुस्ती दोन वर्षात पूर्ण झाली असून येथील रस्ताही रुंद झाला आहे. धोकादायक परिसर संरक्षित झाला असला तरीही सात किमीच्या आंबा घाटातील काही वळणांवर डोंगरातील माती पावसाळ्यात खाली येण्याची भीती आहे. www.konkantoday.com




